फोक प्रबोधन अभिमान लोककलेचा, वारसा ह्यो परंपरेचा English
महाराष्ट्राची लोककला

आमच्याविषयी

अभिमान लोककलेचा, वारसा ह्यो परंपरेचा

फोक प्रबोधन हा महाराष्ट्राच्या लोककलेचा जिवंत उत्सव आहे.

गोंधळ, भारूड, पोवाडा, लावणी, जागरण आणि वासुदेव — ज्या कला पिढ्यानपिढ्या गावागावातून चालत आल्या, त्या आजच्या रंगमंचावर त्याच ताकदीने सादर करणे हेच आमचे काम.

ढोलकी, तुणतुणे, संबळ, हलगी आणि टाळ या पारंपरिक वाद्यांच्या साथीने चाळीसहून अधिक कलाकार हा कार्यक्रम उभा करतात.

निर्मात्या — पूजा जाधव

आमच्या लोककला

पिढ्यानपिढ्या चालत आलेले कलाप्रकार, आजच्या रंगमंचावर.

गोंधळ

देवीच्या जागरणातून आलेला, संबळाच्या तालावर सादर होणारा विधीनाट्य प्रकार.

भारूड

संत एकनाथांच्या रचनांवर आधारित, रूपकातून तत्त्वज्ञान सांगणारा नाट्यप्रकार.

पोवाडा

शाहिरांनी गायलेला वीररसपूर्ण इतिहास — डफाच्या कडकडाटासह.

लावणी

ढोलकीच्या ठेक्यावर नृत्य आणि अदाकारीचा महाराष्ट्रातील सर्वात ओळखीचा प्रकार.

पुढील कार्यक्रमाची माहिती हवी?

नवीन तारखा सर्वात आधी इथेच जाहीर होतात.

Instagram YouTube